अखेर झाली मूलचेरा तालुक्यातील त्या बोटची दुरुस्ती…

570

विदर्भ ब्युरोचिफ प्रशांत शाहा

मुलचेरा: तालुक्यातील वेंगणुर ग्रामपंचायत येथे गडचिरोली कलेक्टर ऑफिस कडून काही वर्षांपूर्वी मिळालेल्या बोटची अनेक ठिकाणी लिकेज झाली होती. वेंगणुर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सुरगाव, पडकोटोला, अडंगेपल्ली या गावातील नागरिकांना आरोग्य केंद्रात, जीवन आवश्यक वस्तू करिता,शेती विषयी व बँकेच्या कामा करिता रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचा नदी पात्रातून रेगडी या गावी यावा लागतो.

बोटशिवाय गावकऱ्यांना पर्यायच नाही. अश्यात गावातील उपसरपंच नरेश कांदो यांनी या विषय ग्रामपंचायत सचिव श्री,पि डी गुगलोट,तलाठी श्री,आर जे उसेंडी व मूलचेराचे तहसीलदार श्री,के बी अटकर साहेब यांना निवेदनातून बोट दुरुस्ती करण्याची मागणी केली.

मूलचेराचे तहसीलदार श्री मा.अटकर साहेब यांनी मांगणीचे दखल घेऊन वेंगणुर येथील बोटीचे दुरूस्ती करून दिली. बोट दुरुस्त झाल्याने गावकऱ्यांन मध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी वेंगणुर,पडकोटोला,अडंगेपल्ली,सुरगाव येथील नागरिक तहसीलदार मूलचेरा ,तलाठी,सचिव यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

बोट दुरुस्ती करतांना उपसरपंच नरेश कांदो,प्रकाश गोटा,मुनेश्वर नरोटे,सोन्या गावडे,सीताराम मडावी,वसंत गोटा,मंगु कांदो व गावकरी सहकार्य केले.