जिवती तालुक्यातील घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी… राष्ट्रवादी युवक काँग्रेस, चंद्रपुरचे जिल्हा प्रवक्ते प्रलय म्हशाखेत्री यांचे विधान

1141

चंद्रपूर: काल दि.22/8/2021 ला जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात घडलेल्या घटनेचा निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा प्रवक्ते, प्रलय म्हशाखेत्री यांनी समाज माध्यमावर केला आहे.

या पुरोगामी महाराष्ट्रात शिव, शाहू , फुले,आंबेडकरांचा वारसा आहे. आणि याच महाराष्ट्रात अश्या निंदनीय घटना घडल्याने या वारसेला धोका निर्माण होत आहे..

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका हा दुर्गम भागातील आहे, जिथे काही गावात तर वीज सुद्धा पोहचली नाही. तिथे प्रबोधन नेमके कसे पोहचणार हा प्रश्न प्रलय म्हशाखेत्री यांनी मांडला.

परंतु आता वक्त्यांची टीम जोमाने जिवती तालुक्याकडे लक्ष देतील आणि जोमाने प्रबोधन करून आम्ही खऱ्या अर्थाने याच पुरोगामी महाराष्ट्राचे आहोत हे दाखवून देऊ. पुढे अश्या घटना कधीही घडणार नाहीत असे आश्वासन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा वक्ते प्रलय म्हशाखेत्री यांनी दिले आहे.