मनसेच्या महिला सेनेनी पोलीस बांधवांना राखी बांधुन साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम..

280

बल्लारपूर:-महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या बल्लारपूर तालूका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार यांच्या नेतृत्वात दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो. यावर्षी सुद्धा मनसेच्या बल्लारपूर महिला पदाधिकार्यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील पोलीस बांधवांना राखी बांधुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

कोरोना महामारीच्या काळात पोलीस बांधवांनी कुठलीही पर्वा न करता दिवसरात्र जनतेची सेवा केली. अशीच सेवा आपल्या हातून घडत राहावी महिलांचे रक्षण करावे यासाठी पोलीस बांधवांना रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून मनसे महिलासेना बल्लारपूरच्या पदाधिकार्यांनी राखी बांधून शहराच्या रक्षणाचे वचन घेतले.

यावेळी बल्लारपूर महिलासेना तालूका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार, शहराध्यक्षा मंगला घडले, तालूका सचिव गोरक्का दासारपू, शालीनी मेश्राम,संगीता वनकर,इंदिरा खडतड आदि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते.