“सुरजागड’ लोहप्रकल्पाला विरोध कायम….सुरजागड-परसलगोंदी या गावाजवळ नक्षली पत्रके टाकून लोहप्रकल्पाला पुन्हा एकदा तीव्र विरोध

755

एटापल्ली :- अहेरी उपविभागांतर्गत एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे या प्रकल्पाला प्रारंभापासून होत आलेला नक्षल्यांचा विरोध 26 ऑगस्ट रोजी नक्षल्यांनी सुरजागड-परसलगोंदी या गावाजवळ नक्षली पत्रके टाकून लोहप्रकल्पाला पुन्हा एकदा तीव्र विरोध दर्शविला आहे.

सुरजागड पहाडीवरील बंद केले नाहीतर ही शेवटची चेतावणी, असेही या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह सदर प्रकल्पांतर्गत कार्यरत मजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

26 ऑगस्ट रोजी एकीकडे जिल्हावासीय जिल्हा निर्मितीचा 39 वर्धापन दिन उत्साहात साजरा करीत असतांना अहेरी उपविभागातील एटापल्ली तालुका मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर असलेल्या हेडरी पोलिस मदत केंद्राअंतर्गत गट्टा (जांभिया) मार्गावरील या परसलगोंदी गावाजवळ या नक्षल्यांनी पत्रके सुरजागड • टाकून पहाडीवरील प्रकल्पाला विरोध दर्शविला.

यापूर्वी लॉयड अँड मेटल या कंपनीद्वारे लोह उत्खननाने काम सुरु होते. या प्रकल्पाच्या प्रारंभीपासूनच नक्षली सातत्याने विरोध दर्शवित आहेत. अनेकदा नक्षल्यांद्वारे हिंसक कारवाया घडवून आणण्यात आल्या.त्यामुळे मध्यतराच्या काळात सदर काम ठप्पही पडले होते.

त्यानंतर पोलिस विभागाच्या सशस्त्र निगराणीखाली या प्रकल्पाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत लॉयड अँड मेटल या मुख्य कंपनीच्या त्रिवेणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे येथील लोह उत्खनाने काम सद्यस्थितीत सुरु आहे. दरम्यान नक्षल्यांनी पुन्हा पसलगोंदी गावाजवळ पत्रके टाकून या प्रकल्पाला असलेला विरोध स्पष्ट व्यक्त केला आहे.