शेतातील लाईन दुरुस्तीचे काम करताना कामगाराचा मृत्यूः नागभीड तालुक्यातील घटना

732

नागभीड- नागभीड तालुक्यातील जनकापुर येथे शेतावरील विद्युत दुरूस्ती काम करत असतांना विजेचा धक्का लागल्याने तरुण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतकाचे नाव विनोद बारीकराव शेन्डे (वय 44वर्ष) असे असुन आज सकाळी 10 वाजता चे दरम्यान तुकाराम माहादेव बारसागडे यांचे शेतातील लाईन दुरुस्तीचे काम करताना विद्युत शाँक लागून जागीच मृत्यू झाला.

सदर युवक विद्युत विभागात हेल्पर चे काम करीत होता. मात्र दुरुस्तीचे काम करतांना एल.सी. बी. बंद करून त्या ठिकानी एका लाईनमन ला बसवून ठेवले असतानाही विजेचा कंरट लागला कसा असाही प्रश्न उपस्थित केला जात असुन काही घातपाताचा संशय असल्याचा आरोप मृतकाचे नातेवाईक करीत आहेत.

गावातील विजेचे किरकोळ दुरुस्तिचे कामे करीत असल्याने सदर युवकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मागे दोन मुली, पत्नी, व मातारी आई असा आप्त परिवार आहे. सदर घटनेमुळे घटनास्थळी गावातील नागरीकानी प्रंचढ गर्दी केली होती. दरम्यान घटना स्थळी पोलीसाना पाचारण करावे लागले.स्वत: नागभिड चे ठाणेदार प्रमोद मडामे यांनी घटनास्थळाला भेट देवून परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेचा अधिक तपास ठानेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात नागभिड पोलीस करित आहे.