समाजसेवेच्या नावाखाली भुरट्या दलालांचा शासकीय कार्यालयात अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना त्रास? भाग १

714

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हिच अमुची प्रार्थना अ्न हेच आमचे मागणे ,धर्म जाती ,प्रांत ,भाषा हेच सारे, तु तेज दे…नवचेतना…विश्वास दे..जे सत्य सुंदर सर्वदा…हरविले.आभाळ ज्यांचे…तुच त्यांचा सोबती…सापडेना वाट ज्यांना. तुच त्यांना सोबती..असे कित्येक श्रेष्ठ उद्गार आपण नेहमी ऐकतो. परंतू सध्याच्या काळात काही मानसे माणुसकी हरपून बसले असल्याचे चित्र समाजात पाहायला दिसून येते.

स्वातंत्र्याचा नावाखाली खुप स्वैराचार बोकाळलेला आहे. माहिती अधिकाराचे नियमानुसार सामाजिक आणि संविधानिक काम न करता केवळ स्वार्थासाठी, पोटभरू धंदा करणारी मंडळी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शासकीय , निमशासकीय, आणि खाजगी कार्यालयात धुमाकूळ घालीत असल्याचे चर्चिले जात आहे..

गडचिरोली जिल्हा हा मागास, बऱ्याच प्रमाणात अविकसित आणि नक्षलवादी असलेला, भययुक्त जिल्हा म्हणून ओळखल्या जात असल्याने या जिल्ह्यात विविध विभागातील विकासकामे करण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारी येण्यासाठी धजावत नाही. आणि बदलीच्या माध्यमातून आले तरी पाहिजे तसे मन लाऊन विकासाच्या दृष्टीने असलेल्या शासकीय उपाय योजना राबविण्यात येत नाही.

जे अधिकारी जिल्ह्यातील विकास योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही दलाल , पोटभरू धंदा करण्यासाठी ” माहिती अधिकाराचे ” वारंवार कार्यालयात पत्र टाकून ब्लॉकमेल करण्यात येत असल्याने अधिकारी,, कर्मचारी वर्गांची मानसिकता दिवसेंदिवस खालावली असल्याचे चित्र समोर आले आहे.

त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने ” संविधान बचाव ” या संघटनेच्या नावाखाली आर्थिक लुटमार करण्यासाठी, ब्लॉकमेल करण्यासाठी ” माहिती अधिकार” पत्राचा गैरवापर करणाऱ्या खेमराज राऊत आणि अन्य काही दलालांवर कायदेशीर कारवाई करुन बंदोबस्त करावा. आणि शासकीय कार्यालयात प्रामाणिकपणे कामकाज करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी यांना योग्य न्याय द्यावा.
संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो . तसेच संयम आवश्यक आहे ..!

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.., वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगणारे समाजातील लिडर कधीही कुणाला ब्लॉकमेल करित नाही. प्रामाणिकपणे वागणे हे समाजसेवा करणाऱ्या लिडरांचे काम आहे. अशांना नियमित जनता मदत केल्याशिवाय राहत नाही. गेलेले दिवस परत येत नाहीत. येणारे दिवस कसे येतील,हे सांगता येत नाहीत.

 समाज सेवा करणाऱ्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत,
आणि मनमोकळे पणाने प्रामाणिकपणे काम करण्याचा, जगण्याचा ध्यास मनात बाळगायला पाहिजे.
राजकीय , सामाजिक, धार्मिक भोंदूबाबांनी पोकळ कामांचा कांगावा करित जनतेला सत्ता, संपत्तीने लुटले आहे. अशांना सबब शिकविली पाहिजे.

चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात . माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करण्यासाठी वेळ घालवून, काही अर्थ होत नाही.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्विकारा…. नकारात्मक दृष्टीकोन आणि लुटमार करण्यासाठी करण्यात आलेल्या माहिती अधिकाराखाली त्रास देणारे पत्र हे पंचर झालेल्या टायर सारखे असतात . हे जर समजले नाही तर कायदेविषयक अभ्यास करून घ्यावा.