शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्यक:-जि.प. अध्यक्ष कंकाडालवार…

309

-प्रीतम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी . शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्यक आहे. दृष् समर्थ भारत घडविण्यासाठी व शारिरीकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी युवक, युवतीना व्यायामशाळा प्रभावी माध्यम ठरेल, असे प्रतिपादन जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

अहेरी पंस अंतर्गत ग्रामपंचायत किष्टापूर वेल हद्दीतील दुर्गम अशा रामयापेठा येथील व्यायामशाळा इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना जिप अध्यक्ष कंकडालवार म्हणाले, दुर्गम गावात व्यायामशाळेची इमारत बांधली गेल्याने याचा मला अतिशय आनंद होत आहे. चार वर्षांपूर्वीचे सदर क्षेत्र आणी आताचे क्षेत्र यात प्रचंड फरक झालेला आहे.

रस्ते, शासकीय इमारती, पाणी पुरवठा योजना, विद्युत योजनेचे नविनीकरण आदींसह अनेक योजना कार्यान्वित करण्याचा मी प्रयत्न केला. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात व्यायाम शाळा बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

व्यायामशाळा लोकार्पणाप्रसंगी पंस सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीता चालुरकर, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मौहूर्ले, माजी उपसरपंच अशोक येलमूले, प्रशांत गोडसेलवार, पुनेश कंदकुरीवार, संतोष वसाके, झुरू मडावी, दलसू मडावी, रमेश सिडाम, राजाराम निकुरे आदींसह आविसं पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक उपस्थित होते.