ब्रेकिंग: कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवती ठार…

573

एटापल्ली: एटापल्ली-मुलचेरा मार्गावर एटापल्लीपासून ५ कि.मी अंतरावर कार व दुचाकी यांची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार युवती ठार झाली तर युवक जखमी झाला आहे. कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी घडली.

मुनी झगडु गोटा (२३) रा. गेदा असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. नंदू कतलामी या पोलिसाच्या दुचाकीवर बसून ती बोलेपल्लीला जात होती. दरम्यान नागपूर येथील व्यापारी कारने मुलचेरावरून एटापल्लीला येत होता.

दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेने ती दुचाकीवरून डांबर रस्त्यावर कोसळली यात तिच्या डोक्याला मार लागला. तिला तात्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथून अहेरी येथे हलविताना तिचा मृत्यू झाला. नंदु कतलामी किरकोळ जखमी झाले. कारचालक महेश पुशवानी (५४) नागपूर यांना पोलिसांनी अटक करून वाहन जप्त केले आहे. पुढील तपास एटापल्लीचे ठाणेदार विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.