म्हाताऱ्या वडिलांचा सत्कार कार्यक्रम घेऊन मोटघरे कुटुंबीयांनी समाजापुढे ठेवला आदर्श १०५ वर्षीय ज्येष्ठाचा माजी आमदार निमकर यांच्या हस्ते भावपुर्ण सत्कार

300

दिपक साबने,जिवती

जिवती: एकीकडे जन्मदाते आई वडील म्हातारे झाल्यावर ते बिनकामाचे आहेत त्यांचा काहीच फायदा होत नाही उलट दररोज ची कटकट असते अशी विचारधारा असलेली पिढी आई वडिलांना वृद्धाश्रमात हाकलून देणारी अन दुसरीकडे जन्मदाते म्हातारे झाले तरी ते जिवंत आहेत तोपर्यंत जे काही करता येईल ते सर्व करून ऋण फेडण्याचा प्रयत्न मुले हे खूपच कमी पाहायला मिळतात.
निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती धोंडूजी गोविंदा मोटघरे या जेष्ठ वक्तींनी १०५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या चार मुलांच्या वतीने एक सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ व्यक्ती धोंडूजी गोविंदा मोटघरे (१०५) यांचा भावपुर्ण सत्कार करण्यात आला. हलाखीची परिस्थिती असतांना सुध्दा प्रत्येक समाजातील युवा पिढीला मोटघरे कुटुंबियांकडून प्रेरणादायी ,मार्गदर्शक ठरावा असा स्तुत्य कार्यक्रम घेऊन त्यांच्या डोळ्यादेखत वडिलांचे ऋण फेडल्याबद्धल नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांचे पुत्र मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, जनार्धन मोटघरे, रामचंद्र मोटघरे यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला गुलाब महाराज राठोड, ग्राम पंचायत सदस्य दीपक झाडे, साखरी येथील काशीनाथ पाटील गोरे, चिंचोली येथील माजी सरपंच अर्जुन पाटील पायपरे, गोवरी येथील लहू पाटील बोरकुटे, पो. पा. पाल, माजी पो. पा. सुरेश उरकुडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, जनार्धन मोटघरे, साईनाथ शेरकी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर मोटघरे परिवाराच्या वतीने लगेच गावभोजन देण्यात आले.