सिनाळा येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वॉटर फिल्टर मशीन लोकार्पण सोहळा संपन्न…

263

चंद्रपुर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त स्थानिक आमदार निधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा,सिनाळा येथे दि. २३ सप्टेंबर २०२१ ला वॉटर फिल्टरचा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी वॉटर फिल्टर मशीनचे उदघाटन रोशनी अन्वर खान (महिला व बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपुर) आणि केमाताई रायपुरे पंचायत समिती सभापती चंद्रपूर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी या कार्यक्रमाला विकास जुमनाके (उपसभापती, पंचायत समिती), सपकाळ साहेब (सवर्ग अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर), मडावी साहेब (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चंद्रपूर), फुलझेले साहेब (केंद्रप्रमुख दुर्गापुर), श्याम म्हशाखेत्री (अध्यक्ष शाळा व्यस्थापन समिती), सरिता नरुले (सरपंच ग्रामपंचायत सिनाळा), दयालवार सर (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शाळा,सिनाळा), कासमगोट्टूवार सर, सौ चौधरी मॅडम, सौ केसकर मॅडम, आणि श्रीमती रामटेके मॅडम उपस्थित होत्या…