आलापल्ली ते सिरोंचा व आसरअल्ली या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवा..:- माजी आमदार दिपकदादा आत्राम

292

विजय तोकला ..सिरोंचा तालुका प्रतिनिधी

आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनातुन प्रशासनाने घेतली दखल

सिरोंचा तालुका:- आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 अक्टोबर ला आविस कार्यकर्ते, पदाधिकारी व शेकडो नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देत दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन सादर केले.जर पंधरा दिवसाचे आत खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात न केल्यास रस्त्यावर उतरून जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा ही माजी आमदार आत्राम व आविसने दिला होता.अखेर आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनातुन प्रशासनाने घेतली दखल व आलपल्ली ते सिरोंचा महामार्गावर कामाला सुरुवात.

*जय आदिवासी विद्यार्थी संघटना*💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪