सिरोंचा:-
आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील मोठ-मोठे खड्डे तात्काळ न बुजविल्यास आदिवासी विद्यार्थी संघ सिरोंचा शाखेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आ. तथा आविसं नेते दिपक आत्राम यांच्या नेतृत्वात आविसंच्या शिष्टमंडळाने अतिरीक्त जिल्हाधिकारी यांचेमार्फत
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिले होते.
दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तात्काळ न बुजविल्यास आविसं शाखा सिरोंचा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आविसने दिला आहे.
या निवेदनाची प्रशासनाने दखल घेत या सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू केलेले आहे.