गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी
आरमोरी – सामाजिक कार्यात नवनवीन उपक्रम राबवून लोकांना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्व इच्छेने ना कुठल्या ही नाटकाशी व पथनाट्याशी संबंध नसताना देखिल यांनी समाजाच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे हि विशेष आहे.सुरज चौधरी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा आरमोरी येथे दुर्गा मातेच्या मंदिरासमोर पथनाट्य सादर करण्यात आला.पण हळूहळू पथनाट्याचा विषय समजून घेत गावोगावच्या सेवाभावी व सुशिक्षित लोकांना या कार्यक्रमाबद्दल सोशल मीडिया च्या माध्यमातून माहिती होताच असा जनजागृतीपर कार्यक्रम आपल्या ही गावात व्हावा असा विचार करत अनेक गावच्या दुर्गा माता मंडळांनी संपर्क साधात कार्यक्रम गावात होण्यास विनंती केली असता रासेयो च्या विद्यार्थ्यांनी विनंतीस मान देऊन व आपल्या सेवचे ठायी तत्पर असून रात्री ७ ते १० च्या दरम्यान गावोगावी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली . दिवसभर गावकरी मंडळी शेतीची कामे व मोलमजुरी कामात व्यस्त असतात व सायंकाळी दुर्गा मातेची आरती झाल्यानतंर मातेच्या आशिर्वादा करीता एकत्र होतात या सर्व गोष्टींचा विचार करत एकाच वेळी आपला संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी असल्याची जानून कार्यक्रमाची वेळ ही सायंकाळी ७ ते १० च्या दरम्यान ठरवण्यात आली. दि.११ आक्टोबर ला “स्त्री शक्तीचा जागर” या पथनाट्याचा वडसा तालुक्यातील कोंढाळा येथे तिसरा त्यानंतर कुरुड येथे चौथा आणि कासवी येथे पाचवा प्रयोग सादर करण्यात आला. जनजागृती होत असून महिलावर्गाची पथनाट्याला अधिक गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे लोकांचा या पथनाट्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सदर पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. अश्या गावागावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत व मुलींनी सात च्या आत घरात अशी म्हण कित्येक परीवारांच्या नियमात असतानाही मुलींनी दहा वाजता पर्यंत नारी शक्ती व महिला सक्षमीकरणावर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा जो बळ दाखवला अश्या सर्व मुलींच्या आई वडीलांचे गावोगावच्या प्रतिष्ठित मान्यवरांकडून कौतुक होवून अश्या आई-वडिलांचा आदर्श समाजातील प्रत्येक परिवाराने घ्यावा व मुलींना पुढे नेण्यास बळ द्यावे अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे.
महिलांना समाजात दुय्यम स्थान दिला जातो. अन्यायाविरुद्ध
उठणारा आवाज घरातूनचं दाबण्याचा प्रकार घडत असल्यामुळे समाजात त्याचे पडसाद उच्च शिक्षण घेणारे लोकांच्या उघड्या डोळ्यांचा समोर घडत असतानासुद्धा अगदी तसेच उमटतात.किती घाणेरडी आणि लाज्जास्पद गोष्ट आहे.असले शिक्षण फक्त डिग्रीच्या भरवशावर उच्च दाखवत असते.परंतू असे बिन उपयोगी पुस्तकी ज्ञानाचे शिक्षण कोणत्या कामाचे जे साधं उघड्या डोळ्यांनी अन्याय बघताना सुध्दा तोंडातून आवाज बाहेर पडत नसेल तर कोणत्या कामाचे आहे असले डिग्र्या कमविणारे शिक्षण.खरी गरज आहे समाजात ती सुरज चौधरी यांच्या सारख्या व्यक्तींची ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजातल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी टीम स्त्री शक्तीचा जागर पथनाट्याच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करुन समाजातील उच्च विभूषित लोंकाच्या नजरेला सडेतोड उत्तर देवून नवी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या परिसरात पथनाट्य सादर करायचे असल्यास संपर्क सुरज चौधरी यांच्याशी ७९७२८६७१६६ या नं.साधावा