बंधनकारक असताना मेडिकलवाले ग्राहकांना अधिकृत बिल का देत नाहीत ?

466

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
औषधी घेणाऱ्या ग्राहकांना मेडिकल मधून अधिकृत बिल देणे बंधनकारक असताना बहुतांशी मेडिकलवाले ग्राहकांना अधिकृत बिल देण्याचे टाळतात ..अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या प्रकाराकडे लक्ष घालून मेडिकल वाल्यांवर् उचित कारवाई करावी अशी मागणी आहे.

डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिट्ठी घेऊन मेडिकलमध्ये गेल्यावर ग्राहकांना औषधि देतात अन इतके पैसे झाले असं सांगून अधिकृत बिल देत नाहीत.बिच्चारा ग्राहक सांगितल्यानुसार् पैसे देतो ,अधिकृत बिलाची मागणी ही करत नाही ..!
मात्र मेडीकल चालकांचे कर्तव्य आहे त्याने अधिकृत बिल दिले पाहिजे (जि एस टी सह)
मेडिकलवाले अधिकृत बिल देत नाहीत याचा अर्थ असा होतो,सेल्स टॅक्स ची चोरी त्यांच्याकडून केली जात आहे.. !
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या प्रकाराकडे लक्ष घालून मेडिकल वाल्यांचा मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी आहे.