रेगडी येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन…मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती..

428

गडचिरोली:
दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना सर्व नागरिकांनसाठी विविध शासकीय योजना सुरू आहेत.मात्र अद्याप काही नागरिकांना त्याच्या लाभ कसा घेता येईल याबद्दल महिती नसते. यामुळे त्यांच्यासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी,यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली रेगडी पोलीस मदत केंद्राच्या वतीने रेगडी येथे भव्य जनजागरण मेळावा व आदिवासी रेला नृत्य स्पर्धा महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,पुरुष व स्त्रीयांसाठी हॉलीबाल स्पर्धाचे आयोजन दि. २४ऑक्टोंबर रोज रविवारला करण्यात आले असुन नागरिकांनी उपस्थित राहुन विविध शासकिय योजनांची माहिती जाणून घेऊन त्याचा लाभ घ्यावे व आदिवासी रेला नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान पोलिस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


सदर भव्य जनजागरण मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून चामोर्शीचे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी सागर डुकरे तर उदघाटक म्हणून रेगडी प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उमाकांत मेश्राम प्रमुख अतिथी रेगडीचे क्षेत्रसहायक लंकेश्वर करमकर , पशुवैद्यकीय अधीकारी नरेंद्र पत्तीवार,योगेंद्र मेश्राम,रेगडी ग्राम पंचायत सचिव प्रकाश सलामे,पलसपूरचे सरपंच पौर्णिमा हलधर विकासपल्लीचे सरपंच प्रगती वैद्य, माडेआमगावचे सरपंच अमोल पुंगाटी , आश्रमशाळा अधिक्षक डि.एस.राऊत,पोलीस उप निरीक्षक सिनुकुमार बानोत,पोलीस उपनिरीक्षक मगरे,रेगडी चे क्षेत्र सहायक,शिक्षक एन. आर .बुकणे , कृणाल धकाते आदी उपस्थित होते. यावेळी डॉ उमाकांत मेश्राम यांनी सर्व नागरीकांनी कोवीड लसीकरण करुण घ्यावे, गरोदर महीलांकरीता योजना,आदीवासी मातृत्व योजना तर ग्रामसेवक सलामे यांनी घरकुल योजना जिल्हा परिषद येथील विविध योजना जॉब कार्ड , पेशा अंतर्गत विविध योजना ची माहीती सांगीतली.
सदर जनजागरण मेळाव्याला मोठ्या संख्येनी नागरिकांनी उपस्थित राहून विवीध शासकिय योजनांची महिती जाणून घ्यावी व त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस मदत केंद्रांचे प्रभारी अधिकारी नंदकुमार शिंब्रे यांनी केले या जनजागरण मेळाव्यात स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना पारीतोषीक देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार शिंब्रे संचालन कल्पेश मगरे तर आभार सिनु कुमार बानोत यांनी मानले.
मागील काही दिवसात परिसरातील नागरिकांना अनेक योजना मिळवून दिले व योजनेची माहिती दिल्या बद्दल
रेगडी परिसरात पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांचे गावात कौतुक करण्यात येत आहे