दिवाळीनिमित्त गरजूंना एलईडी दिवे आणि रोजगार साहित्यांचे वाटप…संयुक्त वन व्यवस्थापन समिती सिंधी आणि वन विभाग राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन…

269

राजुरा (ता.प्र) :– संयुक्त वनव्यवस्थापन समिती सिंधी आणि वन विभाग राजुरा च्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या शुभपर्वावर आयोजित कार्यक्रमात सिंधी येथील ६० गरजु लाभार्थ्यांना LED चार्जिंग बल्ब आणि ८५ मजुरांना मोहफुल गोळा करण्यासाठी जाळी वाटप करण्यात आले.

या प्रसंगी सिंधी ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा संयुक्त वनव्यवस्थापन समिती सिंधी चे कर्तव्यदक्ष अध्यक्ष रामभाऊ आबाजी ढुमणे यांच्या हस्ते गरजु लाभार्थ्यांना वरील साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सिंधी चे उपसरपंच रामभाऊ ढुमने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वनव्यवस्थापन समिती सचीव तथा क्षेत्र सहायक वीहीरगाव नरेंद्र देशकर, मंगेश रायपल्ले, राजकुमार दामेलवार, मधुकर पाटील धानोरकर, श्रीधर पाटील झुरमुरे, भास्कर मोरे, दाऊजी ठेंगरे , माधव पाटील पिंगे, हेमंत दाते, भैय्या मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते