मेहा-बारसागड, मंगरमेंढा-निफन्द्रा  चौपदरीकरण मार्गावर गतिरोधक व रिफ्लेटर ची मागणी

270

सावली:- सुसाट वेगांना आवर घालण्यासाठी  रस्त्यावर गतिरोधकाची नितांत आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेतांना गतिरोधक असणे गरजेचे आहे. गतिरोधक हे अपघाताला रोखण्याचे माध्यम आहे.त्यामुळे मनुष्य जीवाचे व वन्यजीवाचे अपघात थांबविण्यासाठी या जंगलातील रस्त्यावर गतिरोधक असावे अशी मागणी खुशाल लोडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी केली आहे.
तालुक्यातील जंगली भागात मानव जातीच्या वसाहत आहेत.त्यामुळे कार्यालयीन व ईतर कामे करण्यासाठी जातांना वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने सायकल , दुचाकी ने प्रवास करावा लागतो.परिसरात अनेक जातीची झाडे आहेत.घनदाट झाडाची दाटी असल्याने वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. आसोलमेंढा कालवा असल्याने खाजगी कंत्राटदारांचे  कंपनी च्या वसाहत बसली आहेत.
मंगरमेंढा-निफन्द्रा व मेहा-बसरसागड जंगलातील मध्यभागी  चौपदरीकरण रस्ता आहे. याठिकाणी रस्त्या लगत लहान झुडपे आहेत.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जागा दिसून येत नाही. भरदाव वेगाने येणारी वाहने लक्षात येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढते आहे.या ठिकाणी जाऊन डांबरीकरणाचे काम सुरू असताना सदर कंत्रातदाराकडे  गतिरोधक करावे अशी मागणी केली होती. मात्र संमधीतांनी या बाबतीत दुर्लक्ष करीत गतिरोधक बसविले नाही.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.सद्या हा मार्ग अपघाताला आमंत्रण देणारा झाला आहे.भविष्यात अपघाताने मोठे नुकसान होऊ नये यासाठी संमधीत विभागाकडे  निवेदन सादर करून दहा दिवसांत गतिरोधक व रिप्लेक्टर बसविण्याची मागणी खुशाल लोडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा  त्यांनी यावेळी दिला आहे.