संविधान दिनानिमित्त धनंजय मुंजमकर यांच्याकडून टायगर ग्रुपला संविधानाच्या प्रती भेट…

328

अहेरी: तालुक्यातील आल्लापल्ली येथे संविधान दिनाच्या निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुरेंद्र शेळके, कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून कलाम शेख तसेच सह उदघाटक म्हणून समाजसेवक धनंजय मुंजमकर उपस्थित होते.

संविधान दिनाचे औचित्य साधून समाजसेवक धनंजय मुंजमकर यांनी टायगर ग्रुप बहुउद्देशीय संस्था आल्लापल्लीचे अध्यक्ष दौलत रामटेके, सदस्य छोटू सडमेक, प्रकाश सिंगनेर व सर्व सदस्य यांना संविधान पुस्तक देण्यात आले व टायगर ग्रुपचे अभिनंदन केले..

टायगर ग्रुपच्या माध्यमातून आल्लापल्ली येथे गेल्या तीन चार वर्षांपासून विविध मेडिकल कॅम्प, शालेय प्रशिक्षण, रुग्णवाहिका सेवा, गोरगरिबांना मदत केली जात आहे. त्यामुळे संविधान दिनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला…