Learn2Educate Forum चंद्रपूर व्दारा आरोग्यविषयक सेमीनार संपन्न.

375

चंद्रपूर : Learn2Educate Forum Chandrapur द्वारा चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय, विसापूर येथे “किशोरवयीनमुलींनी आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, परपंरागत समजुती आणी स्वच्छतेबाबत जागरूकता” या विषयावर माहीतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रशांत दंतुलवार, प्रमुख वक्ता असलेल्या फेमीली फिजीशीयन व बालरोग तज्ञ, डॉ. सुवर्णा सोनडवले, फोरम च्या अध्यक्षा एड. योगिता रायपूरे व डॉ. क्षमा गवई मंचावर उपस्थित होत्या व मोठ्या संख्येने विद्यार्थीनीनी हजेरी लावली होती
Learn,2Educate Forum हे संगठन गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य विषयक गरजा पुर्ण करण्यासोबतच त्यांना आरोग्य विषयक समस्यांवर मार्गदर्शन देवून त्यावर उपचार उपलब्ध करून देण्याकरीता सतत कार्य करत आहे.

यावेळी डॉ. सुवर्णा सोनडवले यांनी उपस्थित विद्यार्थीनीशी संवाद साधून त्यांना किशोरवयात होणारे हारमोनल व शारीरीक बदल, मासिक पाळी त्याबाबतच्या समजुती, प्रश्न आणि या सर्व बदलांसोबत त्यांच्या वागणुकीत, विचारात होणारे बदल यावर मार्गदर्शन करत, या होणा-या बदलाला स्विकारतांना सकारात्मक विचारांची गरज आणि सर्वागिण विकास व सुपोषणाकरीता व्यायाम, खाण्यापिण्याच्या सवयी यावर सखोल मार्गदर्शन केले. स्वच्छता ही जगण्याचा अविभाज्य भाग असून स्वच्छता राखतांना घ्यावयाची काळजी व गैरसमजुतींना दूर करून निरोगी जगत ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. क्षमा गवई यांनी देखिल विद्यार्थीनशी संवाद साधून मोबाईल याला मित्र बनविण्या पेक्षा ख-या जिवलग मैत्रिणी बनवून जीवनात खरेपणा ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला. ऐड. योगिता रायपूरे यांनी जगण्यातला आनंद न हरवता आपले ध्येय साध्य करण्याकरीता लक्ष निश्चित करण्याचे हेच वय असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले . सुरेखा साठे व संगिता वेल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चाॅकलेट चे वाटप केले गेले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक सोनाली आत्राम, सुभाष भटवलकर, निशा खोब्रागडे इ. उपस्थित राहून सहकार्य केले.