डोंगरगाव परिसरात वाघाची दहशत…नागरिकांमध्ये भीतीचे सावट…

1369

नागेश ईटेकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव मार्गावर बुधवारला रात्रौ च्या सुमारास वाघ दिसून आल्याने डोंगरगाव परिसरात वाघाची रेलचेल असल्याची खात्री पटली. त्यामुळे नागरिकात भीतीचे सावट पसरले आहे.सदर भाग हा धाबा वन परिक्षेत्रात येतो.

या जंगलात विविध प्राण्यांचा अधिवास आहे.लगतच असलेल्या
कन्हाळगाव अभियारण्यात वाघ, बिबट,अस्वल,चितळ,हरीण, यासह अन्य वन्यजीव अस्तित्वात आहेत.अभयारन्यातून जंगल भ्रमंती करत वाघ डोंगरगाव मार्गावर आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

अश्यातच बुधवारला रात्रोच्या सुमारास डोंगरगाव मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या डोंगरगाव परिसरात शेतीचे काम सुरू आहे.कापूस वेचणी, हरभरा पेरणी,यासह अन्य शेत कामाची लगबग सुरू आहे.आणि परिसरात वाघाचा वावर असल्याचे दिसून आल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

वन्यजीव वन परीक्षेत्राच्या बाहेर कधी मार्गावर तर कधी शेत शिवारात दिसुन येत असल्याने मानव आणि वन्यजीव संघर्षात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.