गडचिरोली जिल्ह्यातील रक्तदानात अग्रेसर असणारी संस्था म्हणजे टायगर ग्रुप…. आजपर्यंत टायगर ग्रुपच्या माध्यमातून ५००० च्या वर रक्तदात्यांनी केले रक्तदान…

327

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी: अहेरी सामान्य रुग्णालय येथे भाग्यश्री सुरेश मडावी या महिलेला AB पॉसिटीव्ह रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. गेल्या २४ तासापासून रक्त कुठेही उपलब्ध होत नव्हते. कारण रक्तदानासाठी पुढे येणारी माणसे कोविड-19 ची लस घेतल्यामुळे रक्तदानासाठी अडचण निर्माण झाली.

रक्त कुठेही उपलब्ध न झाल्यामुळे नातेवाईकांनी टायगर ग्रुपचे अध्यक्ष दौलत भाऊ रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ जाऊन रक्तदान केले. सोबतच आदर्श केशनवार यांनी नवव्यांदा रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडवत माणुसकी जिवंत आहे हे दाखवून दिले.

नेहमीच टायगर ग्रुप हा रक्तदान करण्यात आणि आरोग्याबाबत कुठलीही अडचण असल्यास गरजूंसाठी देवदूत म्हणून पुढे येते असते. आजपर्यत टायगर ग्रुपच्या मार्फत ५००० च्या वर रक्तदान केले आहे, ही बाब नक्कीच प्रशंसनीय आहे. पुढे हे सामाजिक काम असेच सुरू राहील असे मत टायगर ग्रुपचे अध्यक्ष रामटेके यांनी व्यक्त केले.