सागर रामगोनवर यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

316

अहेरी: टायगर ग्रुप चे कोषाध्यक्ष सागर भाऊ रामगोनवर यांच्या वाढदिवसानिमित्य उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे स्वतः सागर यांनी आतापर्यत २५ वेळा रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

सदर शिबिरामध्ये टायगर ग्रुप चे अध्यक्ष दौलतभाऊ रामटेके, उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ जललेवार व सहसचिव आदर्शभाऊ केशनवार तसेच टायगर ग्रुपचे सदस्य कुणाल वर्धलवार, पवन सिडाम, सुरज इप्पावर, अविनाश चांद्रगिरीवार, साईनाथ गावडे, नवीन पोटूवार, राम आत्राम, शाहरूख भाई, जरीना सय्यद, पल्लवी शेट्टे खोब्रागडे इत्यादी रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.