बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी केली बलात्कारचा खोटी तक्रार, एक हजार पोलीस कर्मचारी जुंपले होते आरोपींना शोधण्यासाठी.

660

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात (Nagpur) एक विचित्र घटना समोर आली आहे. दिवसा ढवळ्या एका सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याचे एका तरुणीने पोलिसांकडे तक्रार (police complaint) केली.

आरोपींना शोधण्यासाठी नागपूरमध्ये एक हजार पोलीस कर्मचारी काम करत होते. परंतु तपासाअंती पोलिसांना काहीच सापडले नाही. नंतर तरुणीने खोटी तक्रार केल्याचे निष्पण्ण झाले. जेव्हा मुलीकडून कारण कळाले तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. (girl fake rape case for marrying boyfriend nagpur)

नागपूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार दिली की दोन तरुणांनी तिचे अपहरण केले. तिला चिखली भागातील एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नागपूरमध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणीवर अत्याचार झाला म्हणून पोलीसही हबकून गेले. त्यांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतली आणि तातडीने आरोपींचा शोध सुरू केला.

घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस आयुक्त, अमितेश कुमार आणि अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी यांनी सिताबडी पोलीस स्थानकात हजेरी लावली. अमितेश कुमार यांनी एक हजार पोलिसांचे ४० पथक तयार केले आणि संपूर्ण शहराचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. तसेच पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला रुग्णालयात पाठवले.

पोलिसांनी सहा तास कसून तपास केला आणि ५० जणांची चौकशी केली. सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यास त्यात तरुणी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी नागपूरच्या व्हरायटी चौकात बसमधून उतरली. नंतर ती चालत झांशीची राणी चौकात चालत आली. नंतर तिने १० वाजता रिक्षाअ पकडली आणि रिक्षातून १०.१५ च्या सुमारास आनंद टॉकीज चौकात उतरली. नंतर तीन चाकी रिक्षातून ती मायो रुग्णालयाजवळ १०.२५ वाजता पोहोचली. नंतर तिने तिथून शेअर रिक्षा पकडली आणि चिखली चौकात एकटीच १०.५४ वाजता उतरली. नंतर पेट्रोल पंपाजवळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती कळमना पोलीस स्थानकात ११ वाजून ४ मिनिटांनी चालत आली.

तपासादरम्यान पोलिसांना काहीच आढळले नाही. अखेर मुलीची कसून चौकशी केली असता तिने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी कुंभाड रचले होते. पण प्रियकराशी लग्न करण्यासाठी तिने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजले नाही. परंतु तरुणीच्या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.