मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा ६९ पात्र रूग्णांना मिळाला लाभ…अमर बोडलावर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने मोफत रोगनिदान शिबिर,मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न…

601

नागेश इटेकर,प्रतिनिधी

माजी जि प सदस्य तथा विद्यमान अध्यक्ष श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान,धाबा. यांचा वाढदिवसाच्या औचीत्य साधून वरील शिबीराचे आयोजन करण्यात आले.त्याचप्रमाने रक्तदान शिबिर तसेच पंतप्रधान जीवन विमा योजना ३४०रुपये,अपघाती विमा १२ रुपये चा लाभ मिळवून देण्यात आला.सदर शिबिर जि.प.शाळा भंगाराम तळोधी येथे पार पडली.

शिबिराला माजी जि.प.सदस्य तथा श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान,धाबा विद्यमान अध्यक्ष अमर बोडलावर यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून वरील शिबीराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.वैष्णवी अमर बोडलावार जि.प. सदस्या चंद्रपूर, उद्घाटक म्हणून सौ.सूनिता येग्गेवार पं. स.सभापती गोंडपिपरी,सौ लक्ष्मी बालूगवार सरपंच भंगाराम तळोधी,सूरेंद्र घाबर्डे उपसरपंच भंगाराम तळोधी,कूकडकर ग्राम पंचायत सदस्य,सूनील रामगोनवार अध्यक्ष तं.मू.स. संजय गोविंदवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मारोतीजी अम्मावार माजी उपसरपंच भंगाराम तळोधी,तसेच वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी चमू तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि असंख्य गावकरी उपस्थित होते.या शिबीरामध्ये २७ रक्तदाते रक्तदान केले तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ६९ रुग्णांची निवड झाली,३२ विमाधारकांची नोंद करण्यात आली.