ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर ऑनलाईन व्याख्यान…

413

नागपूर: ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय, कोराडी रोड नागपूर येथे ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाईन व्याख्यान झाले. व्याख्याते म्हणून प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर तथा उद्योजक श्री. अक्षय काळे लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास या विषयावर विविध मुद्दे आणि उदाहरणाच्या आधारे अतिशय सोप्या भाषेत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. जीवन विकासात व्यक्तिमत्व विकासाचा वाटा फार महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही आत्मसात करू शकता हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. शालिनी तोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे समारोपीय भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका वाचनाने झाली. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन स्वरूपात गुगल मीटवर करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. व्‍यंकटी नागरगोजे व ग्रंथपाल कल्पना मुकुंदे यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास कक्षामार्फत या व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानाला शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी श्रोते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.