बल्लारपूरातील श्रुती लोणारे यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा —भारत समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

314

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
बल्लारपूर येथील प्रसिद्ध श्वानसेविका श्रुती लोणारे यांच्या कार्याची दखल घेऊन मानवाधिकार सहायता संघातर्फे नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला.
चंद्रपूर येथील प्रियदर्शींनी सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार सहायता संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शतेंद्रजी शर्मा यांच्या हस्ते श्रुती लोणारे
यांना भारत समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्राणीमात्रांबद्दलचा कळवळा क्वचितच पाहायला मिळतो!पण श्रुती लोणारे यांनी गेल्या अनेक दिवसापासून प्राणीमात्रांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. आर्थिक क्षमता बेताची असतानाही संसारात काटकसर करून,कधी इकडून तिकडून मदत घेऊन प्राण्यांच्या जेवणाची त्या व्यवस्था करताहेत .त्यांचे हे सत्कार्य अनोख्या स्वरूपाचेच् म्हटले पाहिजे.त्यांच्या कार्याची दखल यापूर्वीहि अनेक संस्थांनी घेतली असून अनेक् पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
माझ्या कार्यासाठी मला मदतीची गरज असल्याचे त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना म्हटले आहे.