प्लास्टिक विरोधात जनजागृतीसाठी युवकाचे देशभर पायी भ्रमण .. आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवास पूर्ण. पर्यावरण संवर्धनासाठी कामठीच्या रोहनचा पुढाकार.. आल्लापल्ली येथे ग्रामपंचायततर्फे स्वागत.

354

अहेरी : नागपुर जिल्यातील कामठीचा १९ वर्षाचा तरुण मागील वर्षापासून देशभ्रमणाला निघाला आणि ते सुद्धा पायी. ऐकून विश्वास बसणार नाही. मात्र, या तरुणाने आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवाससुद्धा पूर्ण केला आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. बुधवारी तो चंद्रपूर जिल्हातुन आल्लापल्ली येथे पोहोचला.

रोहन रमेश अग्रवाल हा कामठीचा राहणारा. वडील व्यावसायिक तर आई गृहिणी व त्याला एक लहान बहीण आहे. २५ ऑगस्ट २०२० रोजी तो बारावसी येथून गंगास्नान करून देशभ्रमण करण्यासाठी निघाला. १६ राज्यांचे भ्रमण करून तो बुधवारी आल्लापल्ली येथे आला असता ग्रामपंचायत आल्लापल्ली येथे स्वागत करण्यात आले.
राेहनने आतापर्यंत उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिलनाडू, पाॅंडेचेरी, केरळ, कर्नाटक, गोवा आणि नागपूर-चंद्रपूर-आल्लापल्ली असा २ हजार किलोमीटरचा प्रवास पायी तर २० हजार किलोमीटर कोणी लिप्ट देऊन वाहनातून प्रवास केला. बी.काॅम. द्वितीय वर्षाला शिकत असताना त्यांनी आपल्या देशभ्रमणाची बाब आई-वडिलांना सांगीतली. तेव्हा त्यांनी त्याला वेड्यात काढले. पण रोहनने आपल्या मनात खूणगाठ बांधली व घरून अडीच हजार रुपये घेऊन देशभ्रमण करण्यासाठी निघाला.
रोहन सांगतो, देशात अजूनही खूप माणुसकी शिल्लक आहे. अन्यथा माझे भ्रमण थांबले असते, अनेक लोक भेटतात. कोणी लिफ्ट देतो, कोणी सहकार्य करतो अन्यथा माझ्याजवळ काही नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. तसेच येथून आता रशियामधील सायबेरिया येथे जाण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

विशेषत: प्लास्टिक विरोधात व प्रदूषणाबाबत जनजागृती करायची हे ठरविले असल्याने त्यांनी प्लास्टिक प्रदूषणाबाबत बरीच माहिती सांगितली. तो अनेक ठिकाणी प्लास्टिक विरोधात मार्गदर्शन ही करतो. समाजात माणुसकीचा धर्म निर्माण व्हावा व सुख, समृद्धी व शांतता नांदावी असे त्यांना वाटते.

दिनांक 13 जानेवारी 2022 ला रोहन आल्लापल्ली येथे ग्रामपंचायत ला भेट दिली. त्या क्षणी रोहन अग्रवाल याचे स्वागत करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुप चे अध्यक्ष दौलत भाऊ रामटेके व आल्लापल्ली ग्रामपंचायत चे सरपंच शंकर भाऊ मेश्राम व भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष विजय जी खरवडे व टायगर ग्रुप चे सदस्य, धनंजय चक्रमवार उपस्थित होते.