आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याची ऊर्जा सत्कारामुळे प्राप्त होते. – हरीश शर्मा जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान…

459

नागेश इटेकर,सहसंपादक

प्रत्येक क्षेत्रात कार्यरत व्यक्तीला त्याच्या कार्यात सर्वोत्तम कार्य करण्याची जिद्द व चिकाटी असली पाहिजे. प्रामाणीकपणे कार्य करून आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणे व त्यांच्या कार्याचा गुणगौरव सत्कार स्वरूपात केल्याने त्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष, बल्लारपूर यांनी या प्रसंगी केले.
जेसीआय राजुरा रॉयल्स च्या वतीने बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृह येथे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, जेसीआय चे उपक्षेत्रीय उपाध्यक्ष प्रतीक सारडा, जेसीआय राजुरा अध्यक्ष सुशीला पुरेड्डीवार, माजी अध्यक्ष सुषमा शुक्ला, जेसी स्मृती व्यवहारे उपस्थित होते.
या कार्यक्रमात तरुण भारत चे राजुरा तालुका वार्ताहर बादल बेले, पत्रकार संतोष कुंदोजवार, राममिलन सोनकर, सुरेश साळवे, श्रीकृष्ण गोरे, किरण घाटे या पत्रकाराचा मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसी मंजू गौतम यांनी केले. तर जेसी मधूस्मिता पाढि यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जेसी स्वरूपा झंवर, राधा विरमलवार, डॉ. मनीषा पाटणकर, रितू पांढारे, मनीषा पुन, प्रफ्फुला धोपटे, लक्ष्मी प्रसाद, शांता ठाकूर, नैना तान्द्रा, नितु खेडेकर, स्वतंत्रकुमार शुक्ला, प्रवीण खेडेकर, रामसुमेर निषाद, संमेया एलकापल्ली आदींनी सहकार्य केले.