गडचिरोली::/ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मा. प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले हे जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात असताना भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत त्यांच्या कडे तक्रारी केल्या, यावेळी नागरीकांशी बोलत असताना प्रांताध्यक्ष यांनी, आपण मोदीला शिव्या देऊ शकतो, मारू शकतो असे म्हटले होते. मात्र या घटनेचा व्हिडीओ वायरल करून त्याचा पंतप्रधान मोदींशी संबंध भाजप नेते जोडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. मा.प्रांताध्य्क्षांनी स्वतः या बाबतीत स्पष्ठपणे खुलासा करून आपण स्थानिक गुंड मोदीबाबत बोलत होतो. पंतप्रधान मोदी बाबत नाही असे सांगितले आहे.
तरीही राज्यातील भाजप चे नेते जाणीवपूर्वक स्थानिक गावगुंड मोदीबाबत केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधानाचा संबंध जोडून पंतप्रधान पदाचा व त्या पदाच्या गरीमेचा अपमान करीत आहेत. हि अत्यंत गंभीर बाब आहे. असत्य कथन करून लोकांची दिशाभूल करणे, पंतप्रधान पदाचा अवमान करणे हा दखलपात्र गुन्हा असून यासाठी भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली येथील स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नितीन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, प्रा.राजेश कात्रटवार, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया सेल महासचिव नंदूजी वाईलकर, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, नंदू कायरकर, घनश्याम वाढई, वसंत राऊत, नदीम नाथानी, राकेश रत्नावार, जीतेंद्र मूनघाटे, संजय चन्ने, गौरव एनप्रेद्दीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, मनोज तोटपल्लीवार सह अनेक काँग्रेस नेते व पदादाधिकारी यावेळी उपस्थित होते.