तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात “बौद्धिक संपदा अधिकार” या विषयांवर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न…

273

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर: बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे व्यक्तींना त्यांच्या विचारांच्या निर्मितीवर दिलेले अधिकार. ते सहसा निर्मात्याला विशिष्ट कालावधीसाठी त्याच्या/तिच्या निर्मितीच्या वापरावर विशेष अधिकार देतात. याच विषयाची वर्तमानातील गरज ओळखुन राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था, नागपूर आणि तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवर आभासी पद्धतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला उदघाटक म्हणून अ‍ॅड. अतुल खडसे उपस्थित होते. आपल्या उद्घाटनीय भाषणात अ‍ॅड. खडसे यांनी बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय? आणि या अधिकाराची शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात असलेली गरज यावर विचार व्यक्त केले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेचे श्री. पंकज बोरकर उपस्थित होते. यावेळी बौद्धिक संपदा अधिकाराचा परिचय करून देतांना पेटंट, डिझाइन, भरण्याची प्रक्रिया उपस्थित असलेल्या श्रोत्यांना सांगितली. पुढे बोलताना बौद्धिक संपदा अधिकारातील करियर संधी आणि प्रत्येक क्षेत्रात अधिकाराची असलेली गरज यावर विचार व्यक्त केले.

उदघाटन आणि पहिल्या सत्राला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ज्ञानाला संपत्तीमध्ये कसे रूपांतर करायचे आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य कसे विकसित करावे यावर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात “शैक्षणिक क्षेत्रात कॉपीराइटची भूमिका” या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मंजू दुबे उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात दुबे यांनी शैक्षणिक क्षेत्रात कॉपीराइटचा संबंध कसा येतो यावर आपले विचार प्रकट केले. सोबत कॉपीराइटची सध्या स्थितीत असलेली गरज यावर प्रकाश टाकला.

दुसऱ्या सत्राला अध्यक्ष म्हणून वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक मसराम उपस्थित होते. यांनी कॉपीराईटचे महत्व सांगताना देशात गाजलेल्या कॉपीराईट संबंधी काही घटना सांगितल्या. सोबत कॉपीराईटची आवश्यकता यावर विचार व्यक्त केले. संपूर्ण कार्यशाळेचे प्रास्ताविक भूमिका वर्कशॉप समन्वयक श्रीमती पल्लवी जांभुळकर यांनी मांडली.

कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सचिन हुंगे यांनी केले तर आभार संदीप राहाटे यांनी मानले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अर्शिया सय्यद यांनी केले तर आभार हेमंत खेडीकर यांनी मानले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन स्वर्णिमा कमलवार आणि ऐश्वर्या मिश्रा यांनी केले तर आभार स्मिता भेलावे यांनी केले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी, वरीष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक मसराम, कार्यशाळा समन्वयक श्रीमती पल्लवी जांभुळकर, डॉ. शिल्पा पुराणिक, तांत्रिक साहाय्यक दिनेश मंडपे यांनी केले तसेच ऐश्वर्या मिश्रा, त्रिवेणी कटरे, सिद्धांत ढोणे, सुरज दहागावकर आणि इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.