२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी; १८ फेब्रुवारीला ऑनलाईन वेबिनार

194

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम: “२१ शतकातील रोजगाराची संधी ” या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनारचे आयोजन १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४:३० या वेळेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. या विषयावर पर्सिस्टंट सिस्टीमचे मुख्य माहिती अधिकारी डॉ. वेंकटेश्वरन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नाट्य विभागाच्या साहाय्यक प्रा. प्रियंका सीतासावाद, सिक्वेल इन्फोटेक प्रा.लि.चे मॅनेजिंग पार्टनर अरुण ओझा हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.तरी जिल्ह्यातील युवक-युवतीं या ऑनलाइन व्याख्यानाचा लाभ घ्यावा.
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी
फेसबुक –

https://www.facebook.com.MaharashtraSDEED आणि युट्यूब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या लिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.