नागपूर दूरदर्शनसाठी निवेदक पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन..

236

दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी)

नागपूर  : दूरदर्शन केंद्र नागपूरद्वारा निर्मित कार्यक्रमांसाठी नैमित्तिक निवेदक व निवेदिका या अस्थायी पदासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले आहे. हे पद पूर्णत: अस्थायी असल्याने ते भविष्यात स्थायी होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुखांनी कळविले आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्ष असावे. मराठी भाषेचे ज्ञान असावे. उमेदवार नागपूर शहरातील रहिवासी असावा. अर्जसोबत पासपोर्ट साईजचे छायाचित्र, आधारकार्ड व पदवीची छायांकित प्रत, वयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यक्रम प्रमुख, दूरदर्शन केंद्र, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे अर्ज सादर करावा. लिफाफ्यावर वरील बाजूस नैमित्तिक पदासाठी अर्ज असे लिहावे.