शिवाजी महाराजांचे कतृत्व प्रेरणादायी -प्राचार्या डाॅ. सुलक्षणा भुयार

298

दिनेश मंडपे 
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

 छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय पराक्रमी व्यक्तिमत्व होते. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमाने त्याला पराभूत करता येते हे महाराजांनी वारंवार सिद्ध केले आहे. प्रगाढ शिक्षणाचे धनी असेलेल्या महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नारायणा ई- टेक्नो स्कूलच्या मुख्यध्यापिका डाॅ. सुलक्षणा भुयार यांनी केले. वाठोडा मार्गावरील सर्जू टाऊनशिप जवळ असलेल्या नारायणा ई-टेक्नो स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या मुख्य अतिथीे म्हणून ते बोलत होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय मुख्य व्यवस्थापक राममोहन रेड्डी तर विशेष अतिथीमध्ये सहायक व्यवस्थापक प्रितेश भगत, उपमुख्यध्यापिका राणू सहानी व नारायणा ई- टेक्नो स्कूलचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप कावळे यांची उपस्थिती. प्रारंभी मुख्यध्यापिका प्राचार्या डाॅ. सुलक्षणा भुयार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना डाॅ. सुलक्षणा भुयार म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रगाढ बुद्धिमत्ता व युद्धकौशल्याच्या जोरावर स्वाराज्य निर्मिती करून देशात नवीन चेतना निर्माण केली. त्यांच्या युक्ती, बुद्धी, शक्तीबाबत अनेक इतिहासकारांनी लिहले आहे. महाराजांचे शिक्षण कौशल्यामुळेच शिवराय रयतेचे राज्य स्थापन करण्यास यशस्वी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा अभ्यास करावा, असेही यावेळी डाॅ. सुलक्षणा भुयार म्हणाल्या. यानंतर उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यांनतर वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण घेण्यात आले. यावेळी मो. जहीर हा महाराजांच्या भूमिकेत तर ऐशवर्या शेटीया ही जिजाऊच्या वेशभूषेत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. कार्यक्रमाचे संचालन संगणक शिक्षक चिराग ठक्कर तर आभार विशाल परडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा शर्मा, श्रिकांत ठुले, मो. रजी शेख, याया कुरेशी, अभिषेक उटांगलेसह यांनी परिश्रम घेतले.