हा सत्कार माझ्या कार्याचा नसून आपण केलेल्या सहकार्याचा आहे.. सत्कार सोहळा निमित्त सत्कारमूर्ती माजी गटशिक्षणाधिकारी धनंजय आवारी यांचे भावोद्गार..

563

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी: गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभाग समस्त शिक्षक,केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी, साधनव्यक्ती यांच्या तर्फे नुकतेच बदलून गेलेले गटशिक्षणाधिकारी धनंजय आवारी यांचा सत्कार सोहळा खैरे कुणबी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून तहसीलदार के.डी.मेश्राम तर अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर हे उपस्थित होते.तहसीलदार यांच्या हस्ते माजी गटशिक्षणाधिकारी धनंजय आवारी यांचे सपत्नीक शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी आवारी यांच्या कार्याची स्तुती केली असून असा अधिकारी तालुक्याला पुन्हा भेटणे नाही.त्यांनी कधीही अधिकारीपदाचा बडेजाव न करता शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक पातळीवर तालुक्याला जिल्हास्तरावर नावारूपाला आणले होते.तहसीलदार मेश्राम यांनी शुभेच्छा देताना एखाद्या अधिकाऱ्याचा सत्कार सोहळा होणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असते.चांगले अधिकारी तालुक्याला लाभले की त्या त्या क्षेत्राचा विकास होत असतो. तो अधिकारी कधीही बदलून जाऊ नये असे सर्वांना वाटते पण बदली हा प्रशासनाचा अविभाज्य भाग असून तो आपण मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे.

आवारी साहेब जिथेही जातील तिथे ते आपल्या कार्याची छाप पडतील.अशा शुभेच्छा दिल्या.तर धनंजय आवारी यांनी सत्कारमूर्ती म्हणून बोलताना म्हणाले की तालुक्यात शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून काम करताना मलाही काही अडचणी आल्यात पण त्या अडचणी तालुक्यातील शिक्षकांच्या सहकार्यानेच सुटत केल्या.मी कार्य करत गेलो कारण इथल्या शिक्षकांच्या सहयोग मला वेळोवेळी लाभत गेला.त्यामुळे हा सत्कार माझ्या कार्याचा म्हणून होत असला तरी अप्रतक्षात हा सत्कार आपल्या सहकार्याचा आहे असे भावोद्गार काढले.

कार्यक्रमानिमित्त भोजनव्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सज्जन तेलकापल्लीवर यांनी केले.संचालन साधनव्यक्ती गजभे यांनी केले तर आभार…यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, साधनव्यक्ती यांनी सहकार्य केले.