भंगाराम तळोधी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा लोकार्पण सोहळा आणि पशूंचे आरोग्य शिबीर संपन्न…

471

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिंपरी पं.स.अंतर्गत तळोधीत पशूवैद्यकीय दवाखान्याचा नविन ईमारतीच लोकार्पण सोहळा कृषी व पशुसंवर्धन सभापती जि प चंद्रपूर श्री सूनिलभाऊ उरकूडे यांच्या हस्ते संपन्न झाले.व धनगर समाजाचा उत्सवाचा औचित्य साधून हजारोच्या संख्येत शेळी-मेंढींच्या तपासणी करून औषधी देण्यात आले व लंपीचे लसीकरण सूद्धा करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्या,सौ वैष्णवी अमर बोडलावार, सौ कल्पना संदीप अवथरे, पं. स.सभापती सौ सुनिता भानेश येग्गेवार,माजी जि प सदस्य श्री अमर बोडलावार, सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार, उपसरपंच श्री सुरेंद्र घाबर्डे,ग्रा पं सदस्य श्री परशूराम कूकडकर, श्री सहदेव रेड्डी, सौ गीताताई बूर्रीवार, सौ अर्चनाताई कावळे,सौ ममताताई कोवे, भाजपा तालूका महामंत्री श्री नाना येल्लेवार, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री जिवण अवथरे,तसेच श्री संदिप अवथरे, श्री भानेश येग्गेवार, पशुवैद्यकीय अधिकारी श्री गेडामजी, तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.