नवनियुक्त शिक्षणाधिकारी नागपूर जिल्हा (प्राथमिक) रोहिणी कुंभार यांचे स्वागत

303

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर :-आज मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी शासनमान्य महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना नागपूर जिल्हा याच्या वतीने नवनियुक्त शिक्षणाधिकारी नागपूर जिल्हा (प्राथमिक) रोहिणी कुभारे यांचे शाल ,रोपटे ,भारतीय संविधानाची प्रत देऊन नागपूर जिल्ह्यामध्ये रुजू झाल्याबद्दल त्यांचे संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले.

या वेळी त्यांनी संघटनेला सहकार्य करुन संघटनेच्या समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
शिष्टमंडळा मध्ये नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास भौतमांगे राज्य उपाध्यक्ष ओमकारनाथ दाणी ,कोषाध्यक्ष संजय मानवटकर , जिल्हा उपाध्यक्ष शितल मेश्राम व तालुका अध्यक्ष सावनेर बाळू वानखेडे , मगला पेशने ,गभने मॅडम नारायने मॅडम अष्टणकर मॅडम हे प्रामुख्याने उपस्थित होते.