बार्टी संस्थेतर्फे राहाटे नगर टोली येथे संशोधन सुरू

271

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रादेशिक कार्यालय नागपूर च्या माध्यमातून राहाटे नगर टोली येथे मांग गारोडी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. राहाटे नगर टोली येथील मांग गारोडी समाजाची परीस्थिती आजही बिकट स्वरूपाची आहे. त्यामुळे बार्टी चे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये सर यांच्या आदेशान्वये तसेच मा. इंदिरा अस्वार,मा. वृषाली शिंदे,मा. उमेश सोनवणे विशेष सहकार्याने हे सर्वेक्षण सुरु आहे. सर्व्हक्षणाचे समन्वय मा.नितीन सहारे करीत आहे.या सर्वेक्षणाची जबाबदारी प्रादेशिक कार्यालयाला देण्यात आली आहे. कु. शीतल गडलिंग, यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण समतादुतामार्फत करण्यात आलेले आहे. ह्या सर्व्हेक्षणात मदत करण्याकरीता मिथुन चौधरी,तुषार सूर्यवंशी, प्रीती दुरुगकर,ज्योती करवाडे,मंगेश चहांदे, सुनील काकडे, राष्ट्रापाल डोंगरे,खुशाल ढाक तसेच अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील समता सैनिक दल तसेच इतर संघटनाचा समावेश आहे

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष लोटली तरीही महाराष्ट्रातील नागपूर या शहरातील राहाटे नगर टोळी येथील अनुसूचित जातीमधील मांग गारोडी समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उन्नती झालेली नाही. आजही हा समाज मागसलेल्या अवस्थेत आहे. या अवस्थेची दखल घेऊन बाटीचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये यांनी विकास होण्याकरीता सदर सर्वेक्षण सुरु केले आहे. मांग गारोडी समाजातील सर्व्हेक्षनामध्ये 290 घरांचा सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकुण घरे 350 आहेत. मांग गारोडी समाज हा 50 वर्ष पूर्वीपासून राहाटे नगर याठिकाणी वास्तव्य करत असून त्यांच्याकडे जातीचा दाखला, आधार कार्ड, PAN कार्ड, अंगणवाडी, आरोग्यकेंद्र इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध नाही. ह्या सर्वेक्षनानंतर बार्टी संपूर्ण अहवाल शासनाकडे सादर करून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा कृतीशील प्रयत्न करणार आहे.