समाज समता संघाच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी रेखाताई रामटेके यांची नियुक्ती

800

नागपूर: परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समाज समता संघाच्या क्रियाशील कार्यकर्त्यांची बैठक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. किशोर गजभिये यांचे निवासस्थानी राजगृह नागपूर येथे पार पडली या बैठकीत चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई रामटेके यांची नियुक्ती संघाच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली .

यावेळी समाज समता संघात महिलांचे स्वतंत्र संघटन व मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्यासाठी तालुका व गाव पातळीवर संघटन बांधणीचा कृती कार्यक्रम आखण्यात आला त्यानुसार मनीषा गावंडे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी राखी बबलू रामटेके चंद्रपूर जिल्हा सचिव मीनाताई रामटेके चंद्रपूर जिल्हा महासचिव प्रतिमा ताई मेश्राम गोंडपिपरी तालुकाध्यक्ष मोनी खोब्रागडे बल्लारपूर तालुका अध्यक्ष आणि छायाताई शेंडे यांची बल्लारपुर तालुका कार्याध्यक्ष पदी महिला या पदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी सनदी अधिकारी मा. किशोर गजभिये सर तर प्रमुख अतिथी म्हणून संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष इंजि. नरेंद्र डोंगरे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुन्ना तावाडे बबीताताई दौलत चालखुरे जिल्हाध्यक्ष महिला चंद्रपूर बल्लारपूर तालुका अध्यक्ष शिवाजी गोरघाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या वेळी समाजातील विषमता व जातिभेद नष्ट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येईल समाजाचा व कुटुंबाचा विकास साधण्यासाठी महिलांनी सामाजिक कार्यात अग्रेसर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माननीय किशोर गजभिये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले याप्रसंगी चंद्रपूर बल्लारपूर राजुरा गोंडपिपरी विठ्ठलवाडा ब्रह्मपुरी मुल भद्रावती येथून आलेल्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन इंजि. नरेंद्र डोंगरे यांनी केले तर आभार प्रा. प्रकृती पाटील यांनी मानले