नागपूर:
सध्याची जागतिक परिस्थिती अत्यंत बिकट असून युद्धाचे ढग जगावर तांडव करीत असतांना, शेजारी राष्ट्रात महागाई चा अणुबॉम्ब स्फोट झाला असून भारत हा देश धार्मिक उन्मादात रक्तरंजित होतोय.! स्वतंत्र भारतात सर्व धर्म समभाव ही पद्धती संविधानिक रुजू करण्यात आली.पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी येथे प्रत्येकाला आपल्या धर्माच्या नियमावलीने राहण्याची जगण्याची मुभा दिली आहे. मात्र,या सर्व गोष्टी हेतुपूर्वक जनतेला विसरायला लावून त्यांच्या डोक्यात राख भरण्याचे कार्य धर्म ठेकेदारांनी करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला दिसतो,दिसत आहे.रामनवमीच्या निमित्याने देशात काही ठिकाणी हल्ले झालेत.दिल्ली जवाहर नेहरू विध्यापीठात शाकाहारी-मांसाहारी जेवणावरून विध्यार्थी रक्तबंबाळ झालेत.कोणी काय खावे,काय खाऊ नये,कधी खावे,कधी खाऊ नये हा वैयक्तिक प्रश्न असून त्या प्रश्नाला धार्मिक रंग चढवीत अशांतात पसरवीत राहणे हेच सध्या देशात कशा करिता सुरू आहे?
माझ्या वाचक मित्रांनो!
देशात आर्थिक संकट भयंकर रुद्र रूप धारण करते होत आहे.जनतेला साध्याच पेट्रोल,डिझलं आवाक्या बाहेर जातांना दिसतंय. स्वयंपाक कशावर करण्याचा प्रश्न आ वासून महिला मंडळाच्या पुढ्यात उभा आहे.खाद्य तेल,लोखंड ते अन्नधान्य महागाई चा उचांक गाठत असतांना. शेतकरी वर्गाला भाव कवडीमोलचं,सरकारी नौकर वर्ग संघटित राहत आपला महागाई भत्ता वाढून घेतो.मात्र रस्त्यावर काम करणारा मजूर, असंघटित कामगार हा जिवंत राहण्याची कसरत अगदी सर्कस मधील दोरी वर करतोय! एसटी कामगारांना न्याय मिळतं नाही तर त्यांची डोकी भडकवली जात आहेत.त्यांना हल्लेखोर करण्याचं पाप राजकीय पुढारी करीत आहेत. शहरी, ग्रामीण युवा हाताला काम मागतोय मात्र निराशाजनक वातावरण तयार झाले आहे.ग्रामीण भागातील युवक शेती व्यवसाय तोट्याचा बिनभरवश्याचा व मेहनतीला मोबदला तुटपुंजा किंवा तोटा ही अवस्था असल्याने शेतीपासून लांब होतोय.अशा युवकांना धार्मिक भावनेत गांतवून किती काळ राजकीय पोळ्या भाजल्या जातील.ही स्थिती राहिल्यास भारत देश सुद्धा श्रीलंकेच्या वाटेवर जाण्यास वेळ लागणार नाही.मुळात हा देश आजही आर्थिक संकटात टिकून आहे तो फक्त आणि फक्त मातृसत्ताक पद्धतीचा अवलंब येथील महिला आजही करतात म्हणून..मित्रांनो! ग्रामीण भागातील महिला आजही वर्षभर पुरणारे धान्य,डाळ-दाना,पापळ, लोणचे,तिखट,वड्या अश्या प्रकारातील संकटकाळात उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केलेली व्यवस्था आजही टिकवून ठेवत आहेत. हीच खरी जमेची बाजू असतांना. ह्यावर विचार न करता भांडवलदारांच्या घशात देश टाकायची सुनियोजित कार्य सुरू आहे.वाचक मित्रांनो! कोणताही देश एका व्यक्तीच्या हातात देणे किती भयावह असू शकतं हे रुस-युक्रेन च्या महायुद्धावरून समजून घ्या.भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे,त्याला तसेच राहू द्या.कट्टरवादी धार्मिक ठेकेदारांनी देश बरबाद करण्याचं षडयंत्र सुरू केलेले आहे.सावधान व्हा! भ्रष्टाचार पराकोटीला गेलेला आहेच.मुळात हीच क्रांतीच्या बिजोरोपणाची नांदी ठरू शकते,एवढंच भविष्याच्या उदरात दडलेलं असू शकत.धार्मिक भावना भडकवून देशात आर्थिक विषमता ज्या गतीने वाढत आहे ह्यावरील लक्ष आम जनतेचे दूर व्हावे म्हणून हा सगळा खेळखंडोबा सुरू आहे.माझ्या सर्व धर्मीय नवयुवकानो धर्म ही जगण्याची पद्धती आहे.हा देश येथील संस्कृती, मानवता,शांती हीच प्रगतीची वाट.या देशाला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचण्याची नितांत गरज असून नवयुवकांनी युगात्म डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना आत्मसाथ करावे तरच देश हा धार्मिक द्वेषातून बाहेर पडू शकतो.( विजय विमल सहादेवराव पोहनकर