मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या माध्यमातून बालपंचायात यांनी साजरी केली भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

288

चंद्रपूर- मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर आणि जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा अजयपुर येथील बालपंचायातच्या वतीने आज 14 एप्रिल 2022 रोज गुरुवार ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर तालुक्यातील अजयपुर गावामध्ये भव्य प्रभातफेरी काढून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमूख पाहुणे मा. प्रताप सिंग कोराम (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) व जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेचे वर्ग शिक्षक मा. सतीश मोरे सर आणि बालपंचायात चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर चे वरीष्ठ जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आणि तालुका व्यवस्थापक मा. निकलेश चौधरी शाळा सहाय्यक अधिकारी कु. नालंदा बोथले, व प्राजक्ता दुर्योधन यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य-

हिंदू जातीच्या नियमानुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. केवळ उच्च जातींनाच शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे अस्पृश्य कनिष्ठ जातींची स्थिती गुलामापेक्षाही भयंकर झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित होते. च्यामुळे शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल हे त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी कनिष्ठ जातींत शिक्षण प्रसार व्हावा म्हणून खालील पावले उचलली.

शैक्षणिक जागृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कनिष्ठ जातींच्या शैक्षणिक मागासलेपणाची जाणीव होती. हजारो वर्षांपासून त्यांना शिक्षण नाकारलेले होते. अज्ञान व निरक्षरता यामुळेच त्यांचे उच्च जातींनी शोषण केलेले होते. जी हलक्या प्रतीची कामे उच्च जाती स्वत: करीत नव्हत्या ती कामे उच्च जाती कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिक करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कोट्यवधी अनुयायांना ‘‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’’ असा धारदार व महान संदेश दिला.