जिल्ह्या परिषद प्राथमिक शाळा अडेगांव येथे शाळापूर्व तयारी मेळावा जलोष्यात संपन्न..

372

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी : गोंडपीपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प प्राथ.शाळा अडेगांव येथे शाळा पूर्व तयारी मेळावा सपन्न झाला.अद्यक्षसौ रेखाताई चौधरी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रप्रमुख सुनील मुत्यालवार यांच्या प्रेरणेतून सदर मेळावा संपन्न झाला.कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री.नामदेव राऊत शि.वि.अ.बिट भं तळोधी सहउटघाटक श्री.सजय धुडसे अध्यक्ष-शा- व्थ-स.पमूख पाहुणे श्री.विजयभाऊ चौधरी उपसरपंच बालाजी नागापूरे सदस्य शालीकभाऊ झाडे संतोष कोवे सौ.अल्काताई नागापूरे श्री. जानकिराम उंबरकर श्री.दामोदर पा राऊत पोलिस पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोयर यांनी केले तर शाळापूर्व तयारीचे महत्व व त्याचे आयोजन नियोजन कसे करायचे, त्यात पालकांची व शिक्षकांची जबाबदारी काय असणार याविषयी सविस्तर माहिती शाळेचे सहाय्यक शिक्षक शितल आकोजवार यांनी सांगितली.

त्यानंतर अध्यक्ष सौ.रेखाताई चौधरी सरपंच यांच्या हस्ते फीत कापून प्रत्यक्ष मेळाव्याला सुरुवात झाली.त्यात विद्यार्थी नोंदणी पासून ते गगन पूर्व तयारी पर्यंत एकूण सात स्टॉल लावण्यात आले होते.त्या प्रत्येक स्टॉलवर विविध साहित्याची सजावट करून पुढील सत्रात पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थांना त्या स्टॉलवर विविध कृती करवून त्यांच्या नोंदी ठेवल्या गेल्या.
स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या बालाजी नागापूरे या विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री.भोयर सर मुख्याध्यापक यांनी केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.