टायगर ग्रुपच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मिळाले जीवनदान

301

आल्लापल्ली :  दिनांक 19/ 4 /2022 रोजी अहेरीवरून वरून राहुल मेश्राम , बाबुराव पदा व मनोहर पदा हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकी ने अहेरी ला आले होते आपलं काम आटोपून ते परत चंदनवेली जात असताना आलापल्ली वरून 1 किलोमीटर अंतरावर दुपारी सुमारे 4 च्या दरम्यान सुरजागड कडून येणाऱ्या भरधाव ट्रक ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली व त्यात ते गंभीर जखमी झाले.

तिथे आजू बाजुला असणारे लोक जमा झाले व त्यापैकी एकाने टायगर ग्रुप च्या जनसंपर्क कार्यालयात कॉल करून सदर घटनेबाबत माहिती दिली व लगेच टायगर ग्रुपचे कोषाध्यक्ष सागरभाऊ रामगोनवार आणि रक्त सेवक कुणाल वर्धलवार व अध्यक्ष दौलतभाऊ रामटेके उपाध्यक्ष श्रीकांत जल्लेवार सचिव आदर्शभाऊ केशनवार , वासू मुतेलयवार त्रिशूल डांगरे टायगर ग्रुप चींतलपेठ चे अध्यक्ष सुरज दुर्गे यांनी टायगर ग्रुपच्या रुग्णवाहिका ने जाऊन त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले