धक्कादायक: शालेय मुलींचा विनयभंग ; शिक्षक अटकेत हिरापूर येथील जि. प. शाळेतील प्रकार

1011

बळीराम काळे/जिवती
जिवती : विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याप्रकरणी जिवती तालुक्यातील हिरापुर येथील एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. सदर नराधम शिक्षक पोलीस स्टेशन,जिवती हद्दीतील हिरापूर गावातील जि.प. प्राथमिक शाळेत शिकवतो. ए. के. राठोड (४९) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
अपराध क्र. ३५/२०२२ दिनांक १८ एप्रिल २०२२ कलम ३५४ (अ) , ३७६ (AB),३७६ (२) (N) भांदवी सह ४,६,८,१२ बाललैंगीक अपराधापासून संरक्षण २०१२ नुसार ए. के. राठोड (४९) शिक्षक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असुन जिवती पोलिसांनी संबंधित शिक्षकास अटक केली असून याबाबतची फिर्याद शालेय मुलींनी दिलेली आहे.
आरोपी शिक्षक हे पेपर तपासण्याच्या बहाण्याने पीडित मुलींना कार्यालयात बोलावून घेऊन फिर्यादी मुलीच्या छातीला हात लावणे,तोंड लावणे असा प्रकार मागील एक वर्षांपासून करत होता. याच प्रकारचे कृत्य शाळेत शिकणाऱ्या इतर सहा मुलीबरोबर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलींच्या तोंडी रिपोर्टनुसार जिवती पोलिसात तक्रार केली असून सदर प्रकरणात अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, राजा पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी,राजुरा अतिरिक्त प्रभार गडचांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली निशा खोब्रागडे, महिला पोलीस उपनिरीक्षक या पुढील तपास करीत आहेत.
शाळेतील शिक्षकांच्या वादात आरोपी शिक्षकाचा बळी गेला असा दबक्या आवाजात जनतेत चर्चा सुरू आहे.