गोंडपिपरीत ज्योतिबा फुले– भीम जयंती जल्लोषात साजरी…दोन दिवसीय कार्यक्रमात आनंदाचे वातावरण… सुनील खोब्रागडे यांचे मोलाचे मार्गदर्शन

464

गोंडपिपरी :–माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळवून देणारे राज्यघटनेचे निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात समस्त गोंडपिपरी वासियांनी मोलाचा सहभाग घेत दोन दिवसीय कार्यक्रमात आनंदोत्सव साजरा केला.
भारतीय बौद्ध महासभा गोंडपिपरी तर्फे आयोजित भीम जयंती समारोह आयोजित करण्यात आले. 14 एप्रिल या दिवशी भीम गीतांच्या तालावर बहुसंख्येने नाचत आनंद साजरा केला. महाडचा सत्याग्रह,मनुस्मृती दहन, ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी काढलेली पहिली शाळा अशा वास्तवतेचे दृश्य ट्रॅक्टरवर हुबेहूब साकारण्यात आले. हे दृश्य रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. भीम गीतांच्या तालावर अनेकांनी पाय मोकळे केले. संदीप करपे,उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांनी कार्यकर्त्यांसह रॅलीत सहभाग दर्शवित भीमगीतांच्या तालावर नाचत आनंद साजरा केला.
रॅलीसाठी दीपस्तंभ युवा ग्रुप यांनी अथक परिश्रम घेतले त्याचबरोबर ठाणेदार जीवन राजगुरू यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भीमरॅली यशस्वी होण्याकरिता सिंहाचा वाटा उचलला.

15 एप्रिल रोजी प्रबोधन तथा संगीतमय भीम गीतांची सुरेल मैफल रंगली.सुप्रसिद्ध गायक सुरेंद्र डोंगरे यांनी प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम सादर केला.त्याचप्रमाणे दीपस्तंभ युवा ग्रुप मार्फत मूकनाट्य सादर करण्यात आले. प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उद्धव नारनवरे, कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.रवी तावडे, स्वागताध्यक्ष प्रा.मिलिंद उराडे तर प्रमुख मार्गदर्शक सुनील खोब्रागडे, संपादक दैनिक जनतेचा महासागर मुंबई, रुपेश निमसरकार संविधान अभ्यासक तनुजा रायपुरे, रुपचंद फुलझेले त्यांनी मार्गदर्शन केले. मानवाला जन्मताच निसर्गाने सर्व समान अधिकार प्राप्त होतात मात्र याची खरी अंमलबजावणी संविधानामार्फत केली जाते. आर्थिक, शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळावी याकरिता बाबासाहेबांचे कार्य असून ते प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न शील राहावे अशी भूमिका सुनील खोब्रागडे यांनी मार्गदर्शनातून स्पष्ट केले. सविधान चालविता येत नसेल तर संविधानावर चालायला शिका असे प्रतिपादन संविधान अभ्यासक रुपेश निमसरकार यांनी केले. संचालन कमल खोब्रागडे, प्रास्ताविक राजू झाडे,तर आभार एड.चैताली फुलझेले यांनी मानले.