अभ्यासक्रमात भगवतगीता, बायबल, कुराण यासारखे धार्मिक ग्रंथांचा समावेश नको – मुन्ना तावाडे (जिल्हाध्यक्ष, समाज समता संघ)

276

अभ्यासक्रमात #भगवद_गीता, बायबल, कुराण यासारखे धार्मिक ग्रंथांचा समावेश नको – समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे

बंगळूरच्या एका शाळेत बायबल शिकवायला अनिवार्य करण्यात आले आहे. ही बाब एका अर्थाने चुकीचे असून कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये धार्मिक विषय यायला नको. कारण भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्माचे शिक्षण जर शाळेत जायला लागले तर विद्यार्थ्यांना होणारे संस्कार हे चुकीचे होऊ शकतात त्यामुळे भारतातील कोणत्याही राज्यात किंवा राष्ट्रीय शिक्षण प्रणाली मध्ये भगवद्गीता असेल कुराण बायबल हे अभ्यासक्रमात यायला नकोत, असे मत समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी व्यक्त केले.

आजच्या विद्यार्थ्यांना धार्मिक अभ्यासापेक्षा विज्ञान आणि नव्या तंत्रज्ञान शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांमध्ये मूलभूत शिक्षण आणि राष्ट्राला प्रेरक शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्यात यावी अशी मागणी समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी केली आहे.