गोंडपिपरी तालुक्यांतील अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे विजेचा लपंडाव. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची गांवकराची मागणी

632

-शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे परीसरात विघुत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दररोज पधरा मी ते अधा तासाला किवा वारंवार विद्युत् पुरवठा खंडित होत असतो.वातावरण खराब असो किंवा नसो विद्युत पुरवठा खंडित होत असतो.त्यामुळे परीसरातील नागरीकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ही बाब अतिशय गभीर असून ग्राहकांना सुरळित विद्युत पुरवठा करणे महावितरण कंपनीचे काम आहे. तरी परीसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा व विद्युत ग्राहकांना चांगली सुविधा द्यावा करीता जर सदर मागणीची दखल घेऊन विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत केला गेला नाही तर गांवकरी आक्रमक पवित्रा घेणार व महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे माध्यम प्रतिनिधिस सांगितले.