अहेरी शहर आज कडकडीत बंद..!

1566

अहेरी : अहेरी शहरातील पॉवर हाऊस कॉलनीजवळ श्रीरामनगर चौकातील नामफलकावर असलेल्या भगवान श्रीरामाच्या तैलचित्रावर काही दिवसांपूर्वी अहेरी नगर पंचायत प्रशासनातर्फे काळे फासण्यात आले होते, ह्या घटनेमुळे अहेरी शहरातील रामभक्तांचे धार्मिक भावना दुखावल्या होत्या, ह्या विरुद्ध विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तथा ह्या प्रभागातील नागरिकांनी अहेरी पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केले होते..!!

15 दिवसांनंतरही आरोपींवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाले नाही आरोपी मोकाट फिरत आहे, त्यामुळे *अहेरी शहरातील राम भक्तांमद्ये तीव्र नाराजी पसरली आहे, ह्या घटनेतील आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे* ह्या प्रमुख मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आज रोज मंगळवार 10 मे रोजी अहेरी शहर कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले होते, त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे, अहेरी शहरातील संपुर्ण बाजारपेठ आज 100% कडकडीत बंद आहे..!!