ब्रेकिंग: बिबट्याच्या हल्यात बालिका गंभीर जखमी…दुर्गापूर परिसरातील घटना…

1848

चंद्रपुर: आज रात्रौ ८:३० वाजता दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक 1 येथील कु. आरक्षा जगजीवन कोपुलवार बाहेर अंगणात खेळत असताना बिबट्याने पकडल्याने ती गंभीर जखमी झाली.

आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिला सोडून दिले. त्या जखमी आरक्षा ला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.