गुप्ता कॅट्रक्शन नागपूर,यांच्या लापरवाही,मुळे गंगामाता देवस्थान माराईपाटन रस्त्याची अक्षरशः दुर्दशा

721

बळीराम काळे/जिवती

जिवती : प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत गृह मंत्रालयाकडून मागणी केल्यानुसार केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभाग, नवी दिली रस्ते जोडणी व रस्ते सुधारण्यासाठी जिवती तालुक्यातील अनेक नवीन रस्त्यांचे काम विविध कॅट्रक्शन च्या माध्यमातून सुरू आहे. त्यापैकी गंगा माता देवस्थान माराईपाटण या रस्त्याचे काम ,,गुप्ता कॅट्रक्शन नागपूर,, हे करीत आहेत. ते काम अतिशय धिम गतीने सुरू आहे, पण माराईपाटण येथील यात्रा होळी पासून सुरुवात होऊनही यात्रा संपुष्टात आली.तरी पण वाहनांची भरपुर प्रमाणात आवक जावक रहदारी असते.परंतु माराईपाटण – टेकामंडवा रस्त्यावर पूर्णपणे गिट्टी विखुरलेली आहे, रस्त्यावर मोठं मोठे बोल्डर उघडे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहन धारकांना मार्ग काढण्याकरिता जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.रात्रीच्या वेळेस दु चाकी चालवणे म्हणजे खूपच घातक बनले आहे.टेकामंडवा ते माराईपाटण या रस्त्याच्या दुर्दशामुळे हली पाच – सहा दुचाकी स्वार बोल्डर, गिटटी मुळे घसरून पडले आहेत.परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही,पण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माराईपाटण येथील यात्रेला येणारे भक्त व परिसरातील नागरिक रस्त्याच्या दुर्दशामुळे वैतागले आहेत. त्वरित टेकामांडवा ते माराईपाटण रस्त्याचे काम सुरू केले नाही तर परिसरातील नागरिकानी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.