लोढ- बे, और जीत- बे च्या नाऱ्यातून बंगाली समाजाचा विकास – पालकमंत्री वडेट्टीवार कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा – शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

623

चंद्रपूर ( प्रतिनिधी )

गेल्या वर्षानुवर्षांपासून महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या बंगाली घ्या परिसरात बंगाली समाजाचे अस्तित्व आहे. या समाजाचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून भाजपाने समाजाचे उपेक्षाच केली आहे. बंगाली समाजाला थोर क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा वारसा लाभला असून त्यांच्या न्याय व हक्कासाठी काँग्रेस आता सर्व परीने मदत करणार असून येणाऱ्या काळात लोढ- बे , और जीत – बे या नाऱ्यातुन बंगाली समाजाचा विकास साधण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन त्याचा बहुजन कल्याण मंत्री व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.ते बंगाली कॅम्प परिसरात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

शहरातील बंगाली कॅम्प परिसरात आयोजित काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहराध्यक्ष नंदू नागरकर, काँग्रेस महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर ,माजी महापौर सुनीता लोढीया, विजय क्रांती कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रवीण लांडगे, मनपा चंद्रपूर चे माजी सभापती मनोरंजन राय, प्रदीप डे, शालिनी भगत, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेवक अमजद अली ,राजेश अडुर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. तत्पूर्वी बंगाली कॅम्प परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कार्यक्रम स्थळापर्यंत प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी व आजार ओ या संख्येने सहभागी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना नामदार वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तारुढ भाजपाने केवळ विकासाच्या नावावर देखावा करून मलींदा लाटण्याचे काम केले आहे. शहरात अमृत योजनेच्या नावाने डंका पिटला मात्र नळाला पाणी आले नाही. कोट्यावधींचा खर्च करूनही बंगाली कॅम्प परिसरातील जनता आजही उपेक्षितच आहे. तर जनतेला भूलथापांना चीत हैरत वाटून मनपातील सत्ताधाऱ्यांनी केवळ माया जमविण्याचा गोरख धंदा चालविला असाही टोला त्यांनी भाजपला लगावला. तद्वतच बंगाली समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्याचे काम देशाच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी केली असून काँग्रेस पक्षाचे व बंगाली समाजाचे ऋणानुबंध नाती आहेत. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना ना. वडेट्टीवार म्हणाले की अहमदाबादच्या धरतीवर 250 कोटी खर्चून इरई नदीचा विकास सोबतच सिंगापूरच्या धर्तीवर 250 कोटी खर्चून ताडोबा टायगर सफारी च्या माध्यमातून पर्यटनात वाढ व 25 कोटी खर्च करून रामाळा तलावाचे सौंदर्य करणार चे काम करण्याचा उदांत हेतू राज्य शासनाचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच बंगाली समाजाला थोर क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा वारसा लाभला असून त्यांनी जो गोऱ्या इंग्रजांशी लढा दिला अगदी त्याचप्रमाणे आता काळ्या इंग्रजांची लढण्यासाठी सज्ज व्हा . व लोढ-बे व जीत-बे चा ना ऱ्यातून नवी क्रांती घडविण्याचे आवाहनही ना. वडेट्टीवार यांनी उपस्थित जनतेला केले. यानंतर चंद्रपूर महानगरपालिका चे माजी सभापती मनोरंजन राय व प्रकाश अधिकारी यांच्या नेतृत्वात शेकडो पुरुष,महिला तसेच भाजपा व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी मंचावर उपस्थित नेतेमंडळींनी आपली मते मांडली. नामदार विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व स्वीकारून झालं पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ना.विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश कष्टी प्रास्ताविक मनिष दास तर आभार हलदर यांनी मानले यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.